
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचा भाव आज पुन्हा एकदा स्वस्त झाला आहे. दुसरीकडे चांदी मात्र चांगलीच चकाकली आहे. भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये अशाच प्रकारे चढउतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (24 नोव्हेंबर) सोन्यात मोठी घसरण झाली. चांदीचा भाव वधारला. या घसरणीनंतर सोन्याचा भाव 1 लाख 23 हजार रुपयांपर्यंत आला आहे. तर चांदीचा भाव 1 लाख 50 हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशच्या माहितीनुसार शुक्रवारी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 112802 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी हा भाव 112720 रुपयांपर्यंत खाली आहे. चांदीच्या भावात मात्र वाढ झालेली पाहायला मिळाली.

बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळच्या तुलनेत संध्याकाळी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. चांदीचा भाव मात्र घसरला होता. आज याउलट सोन्याचा भाव घसरला तर चांदीचा भाव वाढलेला पाहायला मिळाला.

दरम्यान, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या भावात हा चढउतार झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळेच भविष्यात या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव नेमका काय असेल असे विचारले जात आहे.