
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोन्याच्या भावाकडे सामान्यांचे विशेष लक्ष आहे. असे असतानाच आता सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव चांगलेच गडगडले आहेत.

सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचा भाव गडगडल्यामुळे सामान्यांमध्ये आता समाधान व्यक्त केले जात आहे. सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे आता लोकांना गुंतवणूक, दागिने करता येतील. त्यांच्या खिशाला बसणारी झळ आता कमी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसा सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने, चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव तब्बल 800 रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा भावही 2000 रुपयांनी कमी झाला आहे.

आता ताज्या भावानुसार सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 31 हजार 16 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 1 लाख 84 हजार 370 रुपये प्रति एक किलोपर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, सध्या सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्यामुळे सामान्यांत आनंदाचे वातावरण आहे. भविष्यात मात्र नेमके काय होणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. (टीप- सोने, चांदीमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)