
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार होताना पाहायला मिळतंय. दिवाळीआधी सोन्याचा भाव चांगलाच वधारला होता. परंतु दिवाळीनंतर सोने, चांदी या दोन्ही धातूंच्या भावामध्ये कधी घसरण तर कधी मोठी तेजी पाहायला मिळाली आहे

दरम्यान, आजदेखील सराफा बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात त्याचे पडसाद उमटले. मिळालेल्या माहितीनुसार आज जळगावमध्ये चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

चांदीचा भाव एका दिवसात चांगलाच वाढला आहे. आज बाजार चालू झाल्यानंतर सोन्याच्या भावात तब्बल 2 हाज रुपयांची वाढ पाहायला मिळाली. या वाढीसह आता चांदीचा दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 800 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचलाआहे.

सोन्याच्या दरात मात्र किरकोळ अशी 200 रुपयांची घसण झाली आहे. या घसरणीसह सोन्याचा दर विना जीएसटी 1 लाख 22 हजार 800 रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आजदेखील सोने 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सध्याची जागतिक स्थिती, अमेरिकेने लादलेला टॅरिफ कमी केला जाण्याची शक्यता यामुळे सध्या सोन्याच्या भावात ही घसरण झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सोन्याचा भाव 200 रुपयांनी कमी झाल्यानंतर भविष्यातही स्थिती अशीच राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.