Gold Rate : सोनं धाडकन आपटलं, 10 ग्रॅमचा भाव थेट…दागिने घेण्याची हीच ती वेळ!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कमी-जास्त होताना पाहयला मिळतो आहे. सध्या सोन्याचा भाव घसरला आहे. सोन्यासोबच चांदीचा भावदेखील कमी झाला आहे.

| Updated on: Feb 11, 2026 | 3:06 PM
1 / 5
सोनं आणि चांदीचा भाव आजघडीला चांगलाच बदलताना दिसतोय. सोनं कधी महागतंय. तर कधी धाडकन कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. आजदेखील (11 फेब्रुवारी) सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे दागिने करताना सामान्यांचे पैसे काही प्रमाणात वाचणार आहेत.

सोनं आणि चांदीचा भाव आजघडीला चांगलाच बदलताना दिसतोय. सोनं कधी महागतंय. तर कधी धाडकन कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. आजदेखील (11 फेब्रुवारी) सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे दागिने करताना सामान्यांचे पैसे काही प्रमाणात वाचणार आहेत.

2 / 5

सोन्यासोबतच चांदीचा भावदेखील कमी झाला आहे. मंगळवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी 2026 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 143130 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 143000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

3 / 5

चांदीचा भावदेखील 1 हजार रुपयांनी कमी झाला आहे. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 156255 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव बुधवारी 156113 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. म्हणजेच सोनं साधारण 142 रुपयांनी कमी झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 141 रुपयांनी कमी झाला आहे.

4 / 5

चांदीचा भाव मंगळवारी 259100 रुपये प्रति किलो होता. आता हाच भाव बुधवारी 258091 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे. म्हणजेच मंगळवारच्या तुलनते चांदीचा भाव 1009 रुपयांनी कमी झाला आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us