
सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्यात घसरण आली. एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्यात 980 रुपयांची तर 22 कॅरेट सोन्यात 1160 रुपयांची घसरण आली. या किंमतीत राजधानी दिल्लीतील आहेत. तर इतर शहरातही दोन्ही धातूला मोठी घोडदौड करता आलेली नाही. मागणी घसरल्याने किंमती उतरल्या.

बाजारातील तज्ज्ञानुसार, अमेरिकन डॉलर सध्या मजबूत स्थितीत आहे. तर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक लवकरच व्याज कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर सोन्याची मागणी सुद्धा कमी झाली आहे. त्याचा परिणाम किंमतींवर दिसत आहे.

दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,22,170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,12,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. या आठवड्यात दिल्ली सराफा बाजारात किंमतीत हजार रुपयांची घसरण आली आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता मुंबई, चेन्नई कोलकत्ता या शहरात 22 कॅरेट सोन्याची किंमत 111850 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 1,22,020 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. या आठवड्यात तीनही मुख्य शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण आल्याचे दिसून आले.

पुणे आणि बेंगळूरु शहरात किंमती काय? पुणे आणि बेंगळुरू या मेट्रो शहरातील ग्राहकांना सुद्धा सोन्याने दिलासा दिला. या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,22,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,11,850 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. या शहरातही किंमती घसरल्या आहेत.

चांदीत मात्र दरवाढ चांदीने सोन्याचा विरुद्ध चाल खेळली. बाजारात एक आठवड्यात चांदीच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. तर 9 नोव्हेंबर रोजी चांदी 1,52,500 रुपये प्रति किलोवर पोहचली. सोने आणि चांदीवर देशातंर्गत काही घटकांचीही परिणाम झाला. तर जागतिक बाजारातील घाडमोडींचाही परिणाम दिसून आला. जागतिक बाजारात चांदीचा भाव 48.48 डॉलर प्रति औसवर पोहचला.