
गेल्या वर्षीपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे. अक्षरश: सोन्याच्या भावाने आकाशाला स्पर्श केला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा हा मौल्यवान धातू आता सर्वसामान्यांना न परवडणारा झाला आहे. पण आजचा सोन्याचा भाव हा दिलासादायक आहे.

आपल्याकडे कोणताही सण असला किंवा उत्सव असला की सोन्याचे दागिने घालून सजण्याची परंपरा आहे. मग ते वर आणि वधू असू देत किंवा दोघांच्या कुटुंबातील व्यक्ती असू देत सर्वांच्या अंगावर सोन्याचे दागिने असतात. पण हे सोने खरेदी करताना आता 100 वेळा विचार करावा लागत आहे. आजचा सोन्याचा भाव किती जाणून घ्या...

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 64 हजार 79 हजार रुपयांवर तर 3 लाख 55 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत. सलग काही दिवसापासून होत असलेल्या मोठ्या वाढीनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)