Gold Rate Dropped : सोनं तब्बल 18000 रुपयांनी घसरलं, आता 1 तोळा सोन्याचा भाव चक्क…नवी किंमत वाचून चकित व्हाल!
युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु आता सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी झाला आहे. मार्च महिन्यात सोनं चांगलंच स्वस्त झालं आहे. त्यामुळे सामान्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

इराणचे युद्ध आणि अस्थिर जागतिक परिस्थिती यामुळे मार्च महिन्यात सोन्याच्या भावात मोठा चढउतार झालेला पाहायला मिळाला. गेल्या 17 वर्षात जे घडलं नाही, तो चमत्कार मार्च महिन्यात झाला. फक्त एका महिन्यात सोन्याचा भाव 13 टक्क्यांनी घसरण्याची ही घटना 17 वर्षांनी पहिल्यांदाच घडली आहे.

मार्च महिन्यात सोन्याचा भाव तब्बल 13 टक्क्यांनी घसरला आहे. 2018 सालानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. 29 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 5594.82 डॉलर्सवर पोहोचला होता. मार्च महिन्यात आतापर्यंत हा भाव 18.70 टक्क्यांनी घसरला आहे.

भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास 2 मार्च 2026 रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 167471 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोमवारी सकाळी हा भाव 146217 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला होता.

म्हणजेच 2 मार्च 2026 रोजीच्या सोन्याच्या भावाची तुलना करायची झाल्यास सोन्याचा भाव तब्बल 18,181 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. युद्धाच्या काळात सोन्याचा भाव वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु सोन्याचा भाव कमी होताना दिसतोय.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)