एकाच दिवसात सोनं धाडकन आपटलं! 10 ग्रॅमचा भाव चांगलाच घसरला; नवा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत होती. सध्या मात्र सामान्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे. सोन्याचा भाव सध्या घसरला आहे. त्यामुळे लोकांना सोनं खरेदी करताना कमी पैसे द्यावे लागणार आहेत.

| Updated on: May 26, 2026 | 6:42 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात कधी वाढ तर कधी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इराण युद्धामुळे ही अस्थिरता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव वाढत होता.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात कधी वाढ तर कधी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. इराण युद्धामुळे ही अस्थिरता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव वाढत होता.

2 / 5

आता पुन्हा एकदा सोन्याची चकाकी कमी होताना पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव घसरल्याचे समोर आले आहे. आकड्यातच सांगायचे झाल्यास सोनं दहा ग्रॅममागे 700 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोन्यासोबतच चांदीच्या भावातही सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 5

जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दारात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीसह सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 60 हजार 680 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे.

4 / 5

तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 75 हजार 10 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाला आहे. दरम्यान लवकरच इराणचे युद्ध संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेव्हा सोन्याचा भाव असाच घसरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us