1947मध्ये एक तोळा सोन्याचा भाव 88 रुपये, आजपर्यंत 52000% रिटर्न्स
Gold Silver Price | आजही सोन्यातील गुंतवणूक म्हणजे सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक अशी भारतीयांची धारणा आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे.
Follow us
सोने स्थिर.
स्वातंत्र्यानंतर सोन्याने आतापर्यंत एकूण 52000 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 1947 मध्ये सोन्याचे दर 88 रुपये प्रति तोळा होते. 1959 मध्ये पहिल्यांदा सोन्याचे दर 100 रुपये प्रति तोळाच्या पार गेले होते.
1974 मध्ये सोन्याचे दर 500 रुपयांच्या स्तरापलीकडे पोहोचले होते. तर 2007 मध्ये सोन्याचे दर 10000 रुपयांच्या जवळपास पोहोचले होते. सध्या सोन्याचा दर 48500 रुपये प्रतितोळा इतका आहे.
1947 मध्ये चांदीचे दर 107 रुपये प्रति किलो होते. स्वातंत्र्यांनतर चांदीमध्ये 58700% चा रिटर्न मिळाला आहे. 1974 मध्ये चांदीचा दर प्रतिकिलो 1000 रुपये इतका होता.
गेल्यावर्षी चांदीच्या दराने 77,949 रुपये प्रतिकिलो हा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. सध्या चांदीचा दर 65200 रुपये प्रतिकिलो इतका आहे.
चांदीच्या भावात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत