Todays Gold rate: सर्वसामान्यांना खरेदी करता येणार! सोन्याचे भाव कोसळले, आज १० ग्रॅमसाठी…
Todays Gold rate: आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आज १० ग्रॅम सोन्याचा भाव किती झाला आहे?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे समोर आले होते. ऐन सणाच्या वेळी वाढलेले दर पाहाता अनेकांना खरेदी करताना विचार करावा लागत होता. पण आज दिवाळीनंतर सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. चला जाणून घेऊया आजचा १० ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात झालेल्या बदलांनंतर सोन्याच्या दरात अडीच हजारांची तर चांदीच्या दरात तब्बल पाच हजारांची घसरण झाली आहे. घसरलेले दर पाहाता सर्वसामान्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
आज १० ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 43 हजार 170 रुपयांवर आले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 90 हजार 550 रुपयांवर पोहोचले आहेत. दोन दिवसात सोन्याचे दर 3 हजार 800 रुपयांनी घसरले.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)