
सध्या सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव सातत्याने वाढताना पाहायला मिळत होता. त्यानंतर सोन्याला पुन्हा घसरण लागली. आता पुन्हा एकदा सोने तसेच चांदीचा भाव वधारल्याचे पाहायला मिळत आहे.

सोन्याचा भाव एखाद्या सापशिडीच्या खेळाप्रमाणे कधी वाढतोय तर कधी वेगाने कमी होत आहे. बुधवारी (18 फेब्रुवारी) सोन्याचा भाव चांगलाच वाढला. एका दिवसात 1297 रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. या वाढीसह सोन्याचा भाव 152715 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत वाढला.

प्रत्येक शहरांमध्येही सोन्याचा भाव कुठे कमी तर कुठे जास्त असल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 15435 रुपये प्रति ग्रॅमवर तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 14150 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत हा भाव 15420 रुपये प्रति ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 14135 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला. 18 कॅरेट सोन्याने 11565 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत मजल मारली. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 15420 रुपये प्रति ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 14135 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)