
सोने हे भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे, मौल्यवान आणि प्रतिक्षीत वस्तू समजले जाते. लग्नकार्यांमध्ये सोने हा महत्त्वाचा घटक असतो. एखाद्या मुलीला तिच्या कुटुंबाकडून किती सोने दिले जाते यावरुन ते किती श्रीमंत आहेत हे पूर्वी ठरवले जायचे. आजही अनेकजण सोन्याचे दागिने वापरतात. पण सतत वाढणारे सोन्याचे भाव आकाशाला स्पर्श करत आहेत. मात्र, आज हा भाव घसरला आहे.

गेल्या वर्षीपासून सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. हे भाव सर्वसामान्यांच्या खिश्याला न परवडणारे आहेत. त्यामुळे लग्न असो वा कोणता आनंदाचा सोहळा आता सोन्याचे दागे बनवण्यावर तसेच वापरणेही अनेकांनी कमी केले आहे. आज मात्र, हे सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 3 हजार 500 रुपयांनी तर चांदीचे दर 15 हजार रुपयांनी घसरले आहेत.

सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 56 हजार 45 हजार रुपयांवर तर 3 लाख 17 हजार 240 रुपयांवर पोहचले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये मोठी तेजी आली होती. मात्र, आज दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)