भरधाव वाहनं नदीत कोसळली, काही लटकली, फोटोने काळजाचा थरकाप; एकाच भागात दुसरी घटना

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये बुधवारी 9 जुलै 2025 रोजी सकाळी मोठा अपघात घडला. महिसागर नदीवरील पुलाचा एक भाग अचानक तुटला. त्यावेळी काही वाहनं पुलावर होती, ती पत्त्याप्रमाणं नदीत कोसळली

| Edited By: | Updated on: Jul 09, 2025 | 7:25 PM
1 / 7
Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठा अपघात घडला आहे. बडोदा जिल्ह्यात एका पुलाचा भाग अचानक कोसळला. या अपघातावेळी काही वाहनं पुलावर होती. वाहन चालकांना काही कळायचा आतच एका नंतर एक वाहनं नदीत कोसळली. या घटनेत चार वाहनं नदीत कोसळली.

2 / 7
तर काही वाहनं पुलाच्या तुटलेल्या भागावर, काही अधांतरी लटकल्यासारखी दिसली. तर दोन्ही बाजूच्या वाहन चालकांनी प्रसंगावधान राखत वाहनं थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

3 / 7
या अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि मदत कार्याला सुरूवात झाली आहे. पोलीस, आपत्कालीन पथक आणि स्थानिक मदतीसाठी पोहचले आहेत. सकाळी वाहनांची मोठी वर्दळ नसल्याने मोठा धोका टळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

4 / 7
महिसागर नदीवर गंभीरा पूल होता. त्याचा एक भाग आज सकाळी अचानक घसरला. या घटनेवेळी चार वाहने पुलावरून थेट नदीत कोसळली. यामध्ये दोन ट्रक आणि दोन व्हॅनचा समावेश होता. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला.

5 / 7
सकाळी जवळपास  7:30 ही घटना घडल्याचे समजते. सकाळी शाळेची वाहनं, इतर वाहनांची ये-जा सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिक सांगत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलीस, प्रशासनाने लागलीच धाव घेतली.

6 / 7
या घटनेत स्थानिकांसह बचाव पथकाने नदीत पडलेल्या चार लोकांना वाचवले. याठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. काही जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. गंभीरा पूल पडल्याचे कळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी येथे धाव घेतली.

7 / 7
पूल कोसळल्यानंतर या भागात भीतीचे वातावरण तयार झाले. या मार्गावर वाहनांचा खोळंबा झाला. वाहनांची गर्दी वाढू लागल्याने पर्यायी मार्गाकडे वाहतूक वळवण्यात आली. गोताखोरांना बोलावून नदीत शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.