
तुम्हाला थोडंसं काम करूनही थकवा येतो का ? थकवा आणि अशक्तपणामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही का? याचं उत्तर हो असं असेल तर त्याचा अर्थ हा की तुमचा स्टॅमिना कमी झाला आहे. स्टॅमिना कमी झाल्यामुळे काम करण्याची क्षमता कमी होते. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीवर परिणाम होतो. (Photos : Freepik)

जर तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवायचा असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करून त्यात सुधारणा करू शकता.

झोप गरजेची : जीवनशैलीतील बेफिकीरपणामुळे बहुतांश लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. त्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर आणि जीवनावर दिसून येतो. पूर्ण झोपेशिवाय शरीर निरोगी राहत नाही. जास्तीत जास्त काम करायचे असेल तर रात्री कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. यामुळे थकवा दूर होतो आणि शरीर सक्रिय राहते

हेल्दी आणि सकस आहार : संतुलित आणि पौष्टिक आहार हा शरीराची ऊर्जा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हंगामी फळे आणि भाज्या खाणे उत्तम ठरते.आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहारात हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये, सोयाबीन अशा पौष्टिक गोष्टींचा समावेश केल्यास शरीराची कार्य क्षमता झपाट्याने वाढू शकते.त्यामुळे स्ट२णिना मजबूत होतो.

भरपूर पाणी प्यावे : शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळेही आपल्याला अशक्त आणि थकल्यासारखं वाटतं. त्यामुळे मानसिक दुर्बलता आणि सुस्तीही जाणवते. त्यामुळे दिवसभरात वेळोवेळी पाणी प्यायला ठेवा. दररोज किमान 3-4 लिटर पाणी प्यायले पाहिजे.

दररोज व्यायाम : व्यायामामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्यास शरीराला कमालीची मजबुती मिळते. त्यामुळे वजन कमी होते आणि काम करण्याची क्षमता वाढते. जर तुम्हाला जिमला जाता येत नसेल तर घरीच व्यायाम करा. धावणे-चालणे हा देखील एक उत्तम व्यायाम आहे.