
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1970 पासून एकत्र होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली देखील आहेत... ईशा देओल आणि आहाना देओल अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.

एका मुलाखतीत हेमा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. ‘एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’ असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. तेव्हा देखील हेमा मालिनी चर्चेत आल्या होत्या.


यावर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘तेव्हा काय झालं होतं मी सांगते, रात्रभर सिनेमाचं शुटिंग होतं. ज्यामुळे मी प्रचंड थकली होती. प्रेमाच्या गोष्टी एका ठराविक काळापर्यंत चांगल्या वाटतात. पण एका वेळेनंतर सर्वकाही बोरिंग वाटू लागतं…’

सांगायचं झालं तर, हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न आहे. समाजाच्या विरोधात जात दोघांनी लग्न केलं. पण धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी यांनी आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली.