धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी व्याकूळ, पतीच्या निधनानंतर Unseen फोटो अखेर समोर

आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं की, आयुष्य फार कठीण होतं... त्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणींनी मन व्याकूळ होतं... असंच काही अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत देखील झालं असावं... म्हणून धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांनी दोन मुलींसोबत काही खास आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या आहे... हेमा मालिनी यांनी शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated on: Nov 27, 2025 | 11:57 AM
1 / 7
बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबासाठी हा काळ सध्या प्रचंड कठीण आहे...  कारण धर्मेंद्र यांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं...

2 / 7
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबातील कोणीच त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली नाही. पण निधनाच्या तीन दिवसांनंतर हेमा मालिनी यांनी दोन मुली आणि धर्मेंद्र यांच्यासोबत काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.

3 / 7
सांगायचं झालं तर धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांना वैवाहिक आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली. पण त्यांनी  कधीच तक्रार केली नाही.. दोन मुलींसोबत हेमा मालिनी आयुष्याचा आनंद घेतला..

4 / 7
धर्मेंद्र यांनी देखील  हेमा मालिनी, मोठी मुलगी ईशा देओल, लहान मुलगी अहाना देओल यांच्यावर प्रचंड प्रेम केलं...  अनेक मुलाखतींमध्ये देखील धर्मेंद्र यांनी देखील मुलींवर असलेलं प्रेम व्यक्त केलं.

5 / 7
पण अखेर फक्त आठवणी सोबत राहतात... अशात वडिलांना गमावल्याचं दुःख एका मुलीसाठी फार मोठं आहे. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये वायाच्या 90 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. हे त्यांच्या कुटुंबियांसाठी फार मोठं नुकसान आहे.

6 / 7
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. पण लग्नानंतरचा प्रवास हेमा मालिनी यांच्यासाठी फार कठीण होता.

7 / 7
लग्नाला 45 वर्ष झाल्यानंतर देखील हेमा मालिनी यांनी कधीच धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढली नाही... तर 'धर्मेंद्र यांना त्यांच्या मुलांपासून विभक्त करण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता...' असं देखील हेमा मालिनी म्हणालेल्या.