
अभिनेत्री गौहर खान ही नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. वरील फोटोत गौहर खान गुलाबी शरारात खूपच सुंदर दिसत आहे. ईदच्या निमित्ताने तुम्हीही गौहरसारखा लूक करू शकता. तुम्ही गौहरने घातलाय तसा लूज फिट शरारा घालू शकता जो खूपच स्टायलिश दिसत आहे.

हिना खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिना खान अनेकदा वेस्टर्न आउटफिट आणि शरारामध्ये दिसते. तर ईदच्या दिवशी जर तुम्हाला सॉफ्ट रंगाचा शरारा परिधान करायचा असेल तर तुम्ही हिनाप्रमाणे राखाडी आणि गुलाबी रंगाचा शरारा कुर्ती सूट घालू शकता. हिनाचा हा स्लीव्हलेस शरारा खूपच स्टायलिश असून ती यात खूपच सुंदर दिसत आहे.

जर तुम्हाला यंदाच्या ईदला शरारा घालायचा नसेल, तर तुम्ही सारा अली खानचा हटके लूक कॉपी करू शकता. वरील फोटोत साराने लाल रंगाचा वर्क असलेला लेहेंगा परिधान केला आहे. तुम्हीही साराचा हा लूक ट्राय करू शकता. जेणेकरून तुम्ही सगळ्यांपेक्षा युनिक आणि स्टायलिश दिसाल.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. आताही क्रितीने लाल शरारासोबत क्रॉप टॉप घातला आहे आणि त्यावर एक लांब जॅकेट परिधान केले आहे. हा आउटफिट सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. तर ईदच्या दिवशी तुम्हीही क्रितीचा हा लूक कॉपी करू शकता.

जर तुम्हाला ईदला सिंपल लूक करायचा असेल तर तुम्ही हुमा कुरेशीचा लूक कॉपी करू शकता. हुमाने फ्लोरल प्रिंट प्लाझो कुर्ता आणि त्यावर वर्क दुपट्टा घेतला आहे. हुमाचा हा लुक तुम्हाला सिंपल, स्टायलिश आणि मस्त दिसेल.

मौनी रॉय नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. आताही मौनी रॉयने अनारकली सूट परिधान केला असून त्यात ती खुप सुंदर दिसत आहे. या अनारकली सूटवर तिने सिंपल वेणी, कानातले घातले आहेत. मौनीचा हा लूक तुम्ही ईदसाठी ट्राय करु शकता. तुम्ही नक्कीच मौनीप्रमाणे स्टायलिश आणि हटके दिसाल.