आरोपींच्या शोधासाठी गेले अन् पोलिसांवरच हल्ला, डोळ्यांत मिरची पूड, हातात लाठी-रॉड; हिंगोलीतील धक्कादायक घटना

लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर हिंगोलीच्या पळशी गावात घरफोडी आरोपींच्या शोधात असताना हल्ला झाला. हल्लेखोरांनी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि रॉड-काठीने मारहाण केली. यात सहायक पोलीस निरीक्षकांसह अनेक कर्मचारी जखमी झाले. आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

| Updated on: Oct 29, 2026 | 6:27 PM
1 / 6
घर फोडी प्रकरणात आरोपींच्या शोधात आलेल्या लातूर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर हिंगोलीच्या पळशी गावात हल्ला झाला. डोळ्यात मिरची पूड टाकत काठी रॉडने हल्ला केला. हल्यात साह्यक पोलीस निरीक्षकांसह काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली.

2 / 6

घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पळशी गावात आले होते. यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

3 / 6

हल्लेखोरांनी पोलिसांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. तसेच लाठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे.

4 / 6

या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

5 / 6

या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

6 / 6

या प्रकरणातील आठ आरोपींपैकी एक जण भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us