
मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा पाडण्यात आली त्या ठिकाणी आज उद्धव ठाकरे भेट देणार आहेत त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित असणार आहेत.

मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर मुंब्र्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भेट देण्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं. मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले आहेत.

यासंदर्भातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं एक ट्विट खूप चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही, असं पोलिसांनी म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

आज उद्धव ठाकरे दुपारी 3 वाजता मातोश्रीहुन निघणार भांडुप इस्टन एक्सप्रेस हायवेवर त्यांचं ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत स्वागत करतील. आनंद नगर जकात नाका, खारेगाव टोल नाका स्वागत, रेती बंदर, मुंब्रा मध्यवर्ती शाखा इथे देखील उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात येणार आहे.