घराचे नंबर ठरवतात भाग्य! तुमच्या घरात सतत अशुभ गोष्टी घडतायेत? चेक करुन पाहा आणि उपाय करा

घराचा क्रमांक आपल्या जीवनावर मोठा परिणाम करतो हे अंकशास्त्र सांगते. शुभ क्रमांक कुटुंबात सुख-समृद्धी आणतो, तर अशुभ क्रमांक आरोग्य समस्या आणि वादविवाद निर्माण करू शकतो. घर बदलणे शक्य नसेल तर, क्रमांकात इंग्रजी अक्षर जोडून तो शुभ बनवता येतो.

| Updated on: Jul 17, 2025 | 3:21 PM
1 / 8
आपण अनेकदा घर खरेदी करताना आपल्या आवडीचा क्रमांक हा घराचा नंबर म्हणून घेतो. पण तुम्हाला माहितीये का घराचा नंबर हा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकू शकतो. तुमचं घर फक्त चार भिंती आणि छत नाही तर ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींवर परिणाम करते.

2 / 8
अंकशास्त्रानुसार तुमच्या घराचा क्रमांक तुमच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकतो. प्रत्येक अंकाचं स्वतःचं एक रहस्य असतं, जे तुमच्या सुख-समृद्धीवर परिणाम करतं. जर तुमच्या घराचा नंबर तुमच्यासाठी 'लकी चार्म' ठरला, तर नक्कीच तुम्हाला सकारात्मक फळं मिळतात.

3 / 8
पण जर तो नंबर अशुभ असेल तर मात्र तुम्हाला नकारात्मक अनुभवांना सामोरं जावं लागू शकतं. आपण आयुष्यभराची कमाई, स्वप्नं आणि आशा एका घरात गुंतवतो. जर ते घरच आपल्यासाठी अशुभ ठरलं, तर आयुष्याची सगळी पुंजी वाया गेल्यासारखं वाटू शकतं.

4 / 8
तुमच्या घराचा नंबर शुभ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती नांदते. पण जर तुमचे घर अशुभ असेल तर मात्र तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.  जर तुमच्या घराचा नंबर तुमच्यासाठी अशुभ असेल, तर तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात.

5 / 8
जे लोक अशुभ घरात राहतात त्यांच्या घरात सतत आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी सुरु असतात. त्या घरात सतत आजारपण, रोगराई असे वातावरण असते. जे घर अशुभ असते त्या घरात पाऊल टाकताच भांडणं सुरू होतात. अगदी क्षुल्लक गोष्टींवरून त्यांचे मोठे वाद होतात. कधीकधी हे वाद इतके विकोपाला जातात की परिस्थिती हाताबाहेर जाते.

6 / 8
तसेच यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो. ते एकमेकांशी बोलत नाहीत, त्यामुळे नात्यांमध्ये पोकळी निर्माण होते. त्यासोबतच अशुभ घरात राहणाऱ्यांना छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असणं खूप गरजेचं आहे, तरच तुमच्या कुटुंबात भरभराट येते.

7 / 8
अंकशास्त्रानुसार तुमच्या भाग्यांकाच्या क्रमांकाशी मेळ घालून घर घेऊ शकता. हे कायमच शुभ मानलं जातं.  जर घराचा नंबर तुमच्या भाग्यांकाला अनुकूल नसेल तर काय करायचं? असा प्रश्न आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण त्यावर एक सोपा उपाय आहे. जर शक्य असेल, तर तुमच्या भाग्यांकाला अनुकूल असलेलं नवीन घर शोधणं उत्तम ठरेल.

8 / 8
पण घर बदलणं शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सध्याच्या घराच्या क्रमांकामध्ये एखादं इंग्रजी अक्षर जोडून ते भाग्यांकाशी जुळवून घेऊ शकता. उदा तुमच्या 
घराचा नंबर जर 5 असेल तुम्ही '5A' किंवा '5B' असे घराला नाव देऊ शकता. यामुळे तुमच्या घराचा नंबर तुमच्या भाग्यांकाशी जुळेल. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. असं केल्याने तुमच्या घरात कौटुंबिक सुख नांदेल. तसेच धन संपत्तीही वाढेल.

पण घर बदलणं शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सध्याच्या घराच्या क्रमांकामध्ये एखादं इंग्रजी अक्षर जोडून ते भाग्यांकाशी जुळवून घेऊ शकता. उदा तुमच्या घराचा नंबर जर 5 असेल तुम्ही '5A' किंवा '5B' असे घराला नाव देऊ शकता. यामुळे तुमच्या घराचा नंबर तुमच्या भाग्यांकाशी जुळेल. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. असं केल्याने तुमच्या घरात कौटुंबिक सुख नांदेल. तसेच धन संपत्तीही वाढेल.