
प्रत्येकालाच विमानातून प्रवास करावा वाटतो. विमानातून प्रवास करताना फार काळजी घ्यावी लागते. प्रवासादरम्यान एखादी चूक झाल्यास ती फार महागात पडू शकते. एका चुकीमुळे सगळ्या प्रवाशांचा मृत्यू होऊ शकतो.

म्हणूनच विमानात प्रत्येक वस्तू विचार करूनच तयार केली जाते.विमान कित्येक हजार फुटांवरून आकाशात प्रवास करत असते. आकाशात कधी दाट धुके असते तर कधी काळे ढग असतात. कधीकधी आकाशातून पाऊसही पडतो.

परंतु तरीदेखील वैमानिक विमान व्यवस्थितपणे चालवतो. त्याला विमानाच्या खिडकीतून सगळे काही स्पष्ट दिसत असते. यासह प्रवाशांना बाहेर पाहण्यासाठी असलेल्या खिडक्यांवरही धुकं जमा होत नाही. हे नेमके कशामुळे होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

विमानाच्या खिडक्या या सर्वसामान्य खिडक्या नसतात. या खिडक्यांसाठी वापरलेला काच वेगळ्या प्रकारचा असतो. विमानाच्या खिडक्यांवर लावलेल्या काचावर एकूण तीन थर असतात. विमानाच्या खिडकीचा बाहेरचा थर हा थंड तापमान आणि हवेचा कमी दाब सहन करतो.

त्यानंतर विमानाच्या खिडक्यांच्या मधील थर विमानाच्या आतले वातावरण तसेच बाहेरचे वातावरण यात संतुलन कसे राहील याची काळजी घेतो. तर प्रवाशी हात लावू शकतील असा खिडकीचा मधला म्हणजेच तिसरा थर हा अँटी फॉग कोटिंग केलेला असतो. यामुळे खिडक्यांवर धुकं जमा होत नाही.