
हरियाणाच्या हिसार येथील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. तिला सध्या अटक करण्यात आले आहे.

तिचे ट्रॅव्हल विथ गो नावाचे यूट्यूब चॅनेल असून या चॅनेलचे एकूण 3.78 लाख सबस्क्रायबर्स आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 1.33 लाख तर फेसबुकवर 3.21 लाख फोलोअर्स आहेत.

दरम्यान याच ज्योती मल्होत्रावर हेरगिरीचा आरोप आहे. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. ज्योतीच्या वडिलांनी सांगितल्यानुसार कधीकाळी ज्योती दिल्लीमध्ये अवघ्या 20 हजार रुपये पगार देणारी नोकरी करायची. करोना महासाथीच्या काळात ती हिसारमध्ये परतली होती.

दरम्यान, अवघे 20 हजार रुपये कमवणारी ज्योती नंतर पाकिस्तानची गुप्तहेर कशी झाली, असे विचारले जात आहे. पाकिस्तानची सकारात्मक छाप पडावी तसेच पाकिस्तानच्या नीतींचा प्रचार करण्यासाठी विदेशी एजंट्सने तिची निवड केली होती.

पाकिस्तानात असताना तिचा व्यवहार संदिग्ध होता. देशासाठी धोकायक असणाऱ्या काही लोकांच्या ती संपर्कात होती असे म्हटले जात आहे.

सध्या ज्योतीवर देशविरोधी कृती करणे तसेच संवेदनशील माहिती देण्याचा गंभीर आरोप आहे. आतापर्यंत ती कोणा-कोणाच्या संपर्कात होती, याची तापससंस्था शोध घेत आहेत.

तिने आतापर्यंत शत्रूराष्ट्राला कोणती माहिती दिलेली आहे, तसेच त्यातून तिला कोणता आर्थिक लाभ मिळाला, याचीही माहिती घेतली जात आहे.