रिचार्ज संपल्यानंतर Jio नंबर किती दिवस सुरू राहतो?

Jio Recharge : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून तिच्याकडे सुमारे 51 कोटी ग्राहक आहेत. स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आणि आकर्षक ऑफर्समुळे जिओ अनेकांची पसंतीची कंपनी बनली आहे. आज आपण जिओच्या सिमचा रिचार्ज संपल्यानंतर किती दिवस सुरू राहते ते जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: May 17, 2026 | 6:55 PM
1 / 5
जिओकडे अनेक प्रकारचे प्लॅन्स : रिलायन्स जिओ आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. मात्र रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढल्यानंतर अनेकांना एकाच वेळी दोन नंबर रिचार्ज करणे कठीण जाऊ लागले आहे.

जिओकडे अनेक प्रकारचे प्लॅन्स : रिलायन्स जिओ आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. मात्र रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढल्यानंतर अनेकांना एकाच वेळी दोन नंबर रिचार्ज करणे कठीण जाऊ लागले आहे.

2 / 5

सेकंडरी नंबरचे रिचार्ज उशिरा: अनेक मोबाइल वापरकर्ते मुख्य नंबरचा रिचार्ज वेळेवर करतात, पण दुसऱ्या नंबरकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हीही तुमचा जिओ नंबर वेळेवर रिचार्ज करत नसाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

3 / 5

सिम किती दिवस अॅक्टिव्ह राहते? : TRAI) च्या नियमानुसार, जर तुम्ही सिम कार्डवर दीर्घकाळ रिचार्ज केला नाही, तर काही कालावधीनंतर नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो. हा नियम जिओसोबतच एअरटेल, Vi आणि BSNL सारख्या कंपन्यांनाही लागू आहे.

4 / 5

Jio सिम किती दिवस सुरू राहू शकते? : जर तुम्ही जिओ सिम वापरत असाल आणि रिचार्ज संपल्यानंतर नवीन रिचार्ज केला नाही, तरीही तुमचा नंबर साधारण 90 दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह राहू शकतो, त्यानंतर कंपनी तो नंबर बंद करू शकते, आणि तुमचा नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला जाण्याची शक्यता असते.

5 / 5

अनेक यूजर्सचा अनुभव वेगळा : या संदर्भात अनेक यूजर्सनी Reddit वर आपले अनुभव शेअर केले आहेत. काहींच्या मते, रिचार्ज नसतानाही त्यांच्या नंबरवर अनेक महिने इनकमिंग कॉल्स आणि SMS येत होते. याचाच अर्थ काही प्रकरणांमध्ये नंबर लगेच बंद होत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us