AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त आमिर खानच नाही तर, ‘या’ सेलिब्रिटींनी थाटलाय तीन वेळा संसार, एकाचं तर मुलींच्या वयाच्या अभिनेत्रीशी चौथं लग्न

अभिनेता अमिर खान खान अखेर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. आमिर याने मुंबई येथील घरी गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत संसार थाटला आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो देखील समोर आले आहेत. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर याने गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत तिसरं लग्न केलं आहे. पण फक्त आमिर यानेच नाही तर, बॉलिवूडमध्ये अन्य सेलिब्रिटींनी देखील तीन लग्न केली आहेत.

फक्त आमिर खानच नाही तर, 'या' सेलिब्रिटींनी थाटलाय तीन वेळा संसार, एकाचं तर मुलींच्या वयाच्या अभिनेत्रीशी चौथं लग्न
| Updated on: Jul 05, 2026 | 2:11 PM
Share

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर याने नुकताच गौरी हिच्यासोबत लग्न केलं आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिला डेट करत आहे. 60 वाढदिवशी आमिर याने गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर आणि गौरी लग्न केलं आहे. हे आमिर याचं तिसरं लग्न आहे. दोन घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याने तिसरा संसार थाटला आहे. पण या यादीमध्ये अन्य सेलिब्रिटी देखील आहेत.

आमिर खानचं पहिले लग्न 1986मध्ये रीना दत्तासोबत झाले होते. सुमारे 16 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरे लग्न केलं. 2021 मध्ये त्यांनी विभक्त झाल्याची घोषणा केली. आज आमिर खानने गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. एका पेक्षा अधिक लग्न करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये त्यांचं देखील नाव आहे. या बॉलिवूड क्लबमध्ये त्याच्या नावाची भर पडली आहे.

जेव्हा बॉलिवूडमधील सर्वाधिक विवाहांबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा कबीर बेदी यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. त्यांनी दोन – तीन नाही तर चार वेळा लग्न केलं आहे. याची सुरुवात प्रतिमा बेदीपासून झाली. त्यानंतर त्यांनी सुझॅन, निक्की बेदी आणि परवीन दुसांझ यांच्याशी लग्न केलं. जी त्यांच्या मुलीच्या वयाची आहे. आपल्या प्रोफेशनल जीवनासोबतच, ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात.

अभिनेता संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्याचं पहिलं लग्न रिचा शर्मासोबत झालं होतं. तिच्या मृत्यूनंतर संजयने रिया पिल्लईशी लग्न केलं. हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्याने मान्यता दत्ताशी लग्न केलं. आज तो आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे. दोघांना जुळी मुलं आहेत.

टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनेही तीन वेळा लग्न केलं आहे. त्याचं पहिलं लग्न श्रद्धा निगमसोबत झालं होतं. त्यानंतर अभिनेत्री जेनिफरसोबतचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर करणने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केलं. आज ते दोघे एका मुलीचे आई – वडील आहेत.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला