AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! तर आदित्य ठाकरे विधानसभेत येऊच शकले नसते, सचिन अहिर यांच्या विधानाने खळबळ

२०१९ मध्ये मी जर योग्य निर्णय घेतला नसता, तर ठाकरे कुटुंबातील जी व्यक्ती विधानसभेत येऊ पाहत होती, ती येऊ शकली नसती असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

सर्वात मोठी बातमी! तर आदित्य ठाकरे विधानसभेत येऊच शकले नसते, सचिन अहिर यांच्या विधानाने खळबळ
| Updated on: Jul 05, 2026 | 2:20 PM
Share

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या गटात प्रवेश करताच सचिन अहिर विधानसभा उपसभापती म्हणून निवडून आले. आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता 2019 सालच्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?

सचिन अहिर यांनी 2019च्या निवडणुकीवर वक्तव्य केले आहे. “उपसभापती पद मिळाल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी स्वतःहून फोन करून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. मी लवकरच त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराची धुरा माझ्याकडे होती. त्यावेळी संपूर्ण ताकदीने काम करण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणूक झाल्या. जागा आल्या. सर्व घडवून आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे. २०१९ मध्ये मी जर योग्य निर्णय घेतला नसता, तर ठाकरे कुटुंबातील जी व्यक्ती विधानसभेत येऊ पाहत होती, ती येऊ शकली नसती,” असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

“राऊतसाहेबांनी दखल घ्यावी”

पुढे ते म्हणाले की, मी २०१४ नंतर पक्ष वाढीसाठी जी तयारी केली, म्हणूनच त्यांनी २०१९ मध्ये मला सोबत घेतले. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका मी नेहमीच बजावली आहे. तसेच त्यांनी राऊतसाहेबांनी त्यांच्या ‘रोखठोक’ सदरामध्ये या सर्व घडामोडींची दखल घ्यावी असेही म्हटले आहे.

नवीन प्रवासाला सुरुवात करण्याबाबत बोलताना सचिन अहिर म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, नवीन जिद्दीने आणि जोमाने कामाला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, तरीही प्रकृती अस्वास्थ्याची पर्वा न करता ते तिथूनच वॉर रूमचा आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सामाजिक सेवेच्या सुरुवातीपासून, गेली ३० वर्षे ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल रोजी या पवित्र स्थळावर येऊन नतमस्तक होण्याची माझी परंपरा आहे. मला मिळालेल्या घटनात्मक पदाचा मान राखून, या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आहे. घटनेनुसार पुढे काम करण्याची जिद्द मला मिळावी आणि सर्व घटकांना सामान्याना न्याय देता यावा, याच भावनेतून आज मी नतमस्तक झालो.”

Follow Us
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?