AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील मुसळधार पावसाचा तिसरा बळी; चेंबूरनंतर कुर्ल्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू

mumbai tree tragedy : मुंबईच्या कुर्ला भागात झाड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत एक वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील मुसळधार पावसाचा तिसरा बळी; चेंबूरनंतर कुर्ल्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2026 | 2:22 PM
Share

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील 6 दिवसांत मुंबईतील विविध भागात झाड कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये झाड कोसळून एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुर्ल्यातही झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. कुर्ल्याच्या नौपाडा भागात दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनेत वाढ झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला भागातील नौपाडा येथे रविवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास झाड कोसळण्याची घटना घडली. झाड कोसळल्याने 63 वर्षीय व्यक्ती जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परंतु त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. युनूस कुंडावाला असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये झाड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर कुर्ला खैरानी रोडवरही मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर आता कुर्ला भागातही तशीच दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वृद्ध व्यक्तीचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक, मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.

वांद्रे भागातही मोठा अपघात

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बांद्रा पूर्वेच्या खेरवाडी परिसरात एक मोठा अपघात झालाय. या मुसळधार पावसात खेरवाडी परिसरातील मोठं झाड अनेक गाड्यांवर कोसळलं. झाड कोसळल्याने अनेक वाहनांचं नुकसान झालं. दिलासा देणारी बाब म्हणजे या संपूर्ण घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

ठाण्यात 2 घरांवर झाड कोसळलं

ठाण्यातील टेकडी बंगला पाचपाखाडी येथील यशोधन निवास सोसायटीच्या दोन घरांवर झाड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये घरांच्या छताचे पत्र तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनेनंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनकडून झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Follow Us
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?