जिन्स किती वर्ष टिकते? तिची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? 99 टक्के लोकांना नसेल माहिती

जिन्स कधी बदलावी? तुमच्या जिन्सची एक्सपायरी डेट ओळखण्याचे ५ सोपे संकेत आणि डेनिमचे आयुष्य वाढवण्यासाठी खास टिप्स या सविस्तर बातमीतून जाणून घ्या.

| Updated on: Mar 30, 2026 | 1:57 PM
1 / 8
आपण कपड्यांच्या बाबतीत सहसा फॅशन आणि स्टाईल बघतो, पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या लाडक्या जिन्सलाही एक एक्सपायरी डेट असते. वाचून धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

आपण कपड्यांच्या बाबतीत सहसा फॅशन आणि स्टाईल बघतो, पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या लाडक्या जिन्सलाही एक एक्सपायरी डेट असते. वाचून धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

2 / 8

आपण अनेकदा एखादी जिन्स घेतली की ती फाटेपर्यंत किंवा तिचा रंग जाईपर्यंत वापरतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, जिन्स बदलण्याची एक ठराविक वेळ असते, जी केवळ लूकवर नाही तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते.

3 / 8

जिन्स ही प्रामुख्याने मांड्यांच्या भागात (Thigh area) किंवा गुडघ्यांवर सतत घर्षण होत असते. तुम्ही घालत असलेल्या जिन्सचे त्या भागातील कापड नेहमीपेक्षा पातळ वाटत असेल तर समजून जा की ही जिन्स कधीही मधूनच फाटू शकते.

4 / 8

आजकालच्या बहुतेक जिन्समध्ये लायक्रा किंवा स्पॅन्डेक्स असते. सततच्या वापरामुळे आणि धुण्यामुळे हे लवचिक धागे सैल पडतात. जर तुमची जिन्स गुडघ्यापाशी किंवा कमरेला सैल झाली असेल आणि धुवूनही पुन्हा फिट बसत नसेल, तर तिची एक्सपायरी डेट संपली आहे, असे समजा.

5 / 8

डेनिम हे जाड कापड असल्याने ते आर्द्रता (Moisture) शोषून घेते. जर तुमची जिन्स धुतल्यानंतर त्यातून दुर्गंधी येत असेल तर त्यातील धाग्यांमध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी साचलेली असू शकते. यामुळे तुम्हाला त्वचेचा संसर्ग होऊ शकतो.

6 / 8

खूप जुनी झालेली जिन्स धुवून-धुवून कडक होते. तिचे काठ टोचू लागतात. जर जिन्स घातल्यावर तुमच्या त्वचेला खाज येत असेल किंवा लाल चट्टे पडत असतील, तर ते कापड आता वापरण्यायोग्य राहिलेले नाही, हे समजून घ्या.

7 / 8

जिन्सचा रंग फिका पडणे ही सामान्य गोष्ट आहे, पण जर त्यातून पांढरट धागे बाहेर येत असतील किंवा टेक्सचर पूर्णपणे बदलले असेल, तर ती लगेचच बदला. साधारणपणे, एका दर्जेदार जिन्सचे आयुष्य ४०० ते ५०० वेळा वापरणे किंवा २ ते ३ वर्षे इतके असते.

8 / 8

जर तुम्ही ती आठवड्यातून ४-५ दिवस वापरत असाल, तर दीड वर्षाने ती बदलणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरते. जिन्स नेहमी उलटी करून धुवा. ते धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळा, कारण यामुळे कापड लवकर आकसते आणि पातळ होते. मशीन ड्रायरपेक्षा नैसर्गिक हवेत जिन्स वाळवणे उत्तम ठरते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us