
आपल्यापैकी अनेक मद्यप्रेमी हे दारु पिताना आवर्जुन बर्फाचा वापर करतात, बिअर, रम, व्हिस्की यांसह दारुचे विविध प्रकार पिताना त्यात बर्फ टाकला जातो. पण अनेकदा कोणत्या दारुमध्ये किती बर्फ टाकावा, आधी दारु टाकावी की बर्फ असा प्रश्न विचारला जातो. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

दारूत बर्फाचं प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आणि पेयाच्या प्रकारानुसार बदलतं. पण काही मूलभूत नियम पाळल्यास तुम्हाला दारु पिताना नक्कीच चांगला अनुभव मिळू शकतो.

साधारणपणे, तुम्ही तुमच्या ग्लासचा दोन-तृतीयांश भाग बर्फाने भरू शकता. यामुळे तुमचं पेय पुरेसं थंड राहील आणि बर्फ लगेच विरघळणार नाही. जर तुम्हाला कमी थंड पेय हवं असेल, तर तुम्ही कमी बर्फ वापरू शकता.

दारु पिताना बर्फ टाकणे हे दारुवर अवलंबून असते. कॉकटेल्स पिताना बर्फ खूप महत्त्वाचा असतो. यामुळे फक्त पेय थंडच राहत नाही. तर त्यातील वेगवेगळे घटक एकत्र मिसळायला मदत होते. त्यामुळे कॉकटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ वापरला जातो.

जर तुम्ही बिअर पित असाल आणि ती बिअर फ्रीजरमधील असेल तर त्यात बर्फ घालण्याची आवश्यकता नसते. जर तुम्हाला बर्फ घालणं आवडत असेल तर अशा थंड पेयांमध्ये तुम्ही पेय ओतून घेतल्यावर बर्फ घालावा. यामुळे ते दीर्घकाळ थंड राहते.

अनेक लोक व्हिस्की, रम किंवा वोडका पाणी किंवा बर्फ न घालात 'नीट' पितात. कारण त्यांना त्याच्या मूळ चवीचा अनुभव घ्यायचा असतो. पण काही लोकांना व्हिस्कीमध्ये थोडा बर्फ घालणं पसंत करतात.

व्हिस्की, रम किंवा वोडका ही दारु पिताना आधी बर्फ टाकावा. त्यानंतर दारु ग्लासात भरावी. यामुळे ही दारु थंड होते. तसेच यामुळे ती थोडी सौम्य होते आणि प्यायला अधिक आनंददायी वाटते.

वाईनमध्ये सहसा बर्फ टाकला जात नाही, कारण यामुळे तिची मूळ चव बदलते. पण काही लोक उन्हाळ्यात रेड वाइन किंवा व्हाईट वाईन पिण्यापूर्वी त्यात थोडा बर्फ घालतात, त्यामुळे ती थंड होते.

तसेच दारुत बर्फाचा आकारही खूप महत्त्वाचा आहे. मोठे बर्फाचे खडे हळू हळू विरघळतात. यामुळे पेय जास्त काळ थंड राहतं. तसेच जास्त पातळ होत नाही. तर लहान खडे लवकर विरघळतात, ज्यामुळे पेय लवकर पातळ होतं.

शेवटी दारूमध्ये किती बर्फ घालायचा आणि तो कधी घालायचा हे तुमच्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला तुमचं पेय जास्त थंड आणि थोडं सौम्य हवं असेल, तर तुम्ही जास्त बर्फ वापरू शकता. जर तुम्हाला त्याचा मूळ स्वाद अनुभवायचा असेल, तर तुम्ही कमी बर्फ वापरा.