
सध्या ऑपरेशन सिंदूरची सगळीकडे चर्चा होत आहे. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन नेमका कसा जन्माला आला, असे विचारले जात आहे. याबाबतची काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितनुसारा 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आला.

याच काळात भारताच्या रॉ या संस्थेने एकूण 21 दहशतवादी तळांची माहिती दिली होती. यापैकी एकूण दहशतवादी तळांना टार्गेट म्हणून निवडण्यात आलं.

त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला. हा प्लॅन तयार करताना साधारण चार दिवस या ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये होते.

दुसरीकडे पीएम मोदी या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी वॉररुम तयार करण्यात आली होती.