Chanakya Niti : आयुष्यातला सर्वात मोलाचा सल्ला, वाचा यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीती काय सांगते?

आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणूनही ओळकले जाते. भारतीय इतिहासातील ते सर्वाधिक विद्वांनांपैकी एक मानले जातात. त्यांनी जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक बाबी सांगितल्या आहेत.

| Updated on: Mar 30, 2026 | 10:41 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणूनही ओळकले जाते. भारतीय इतिहासातील ते सर्वाधिक विद्वांनांपैकी एक मानले जातात. त्यांनी जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक बाबी सांगितल्या आहेत. त्यांच्या शिकवणीचे पालन केल्यास आयुष्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो.

आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणूनही ओळकले जाते. भारतीय इतिहासातील ते सर्वाधिक विद्वांनांपैकी एक मानले जातात. त्यांनी जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक बाबी सांगितल्या आहेत. त्यांच्या शिकवणीचे पालन केल्यास आयुष्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो.

2 / 5

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत आचार्य चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्यानुसार वेळ ही सर्वाधिक मौल्यवान गोष्ट आहे. वेळेचा आदर करायला हवा. वेळेचा योग्य उपयोग करणारी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते.

3 / 5

आयुष्यात एखादे काम अर्धवट राहिले असेल तर त्याची वाच्यता कोणाकडेही करू नका. चाणक्य यांच्यानुसार कोणतेही काम करताना ते गुप्त ठेवावे. असे केल्यास त्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यात जास्त असते. आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार कोणतेही काम सुरू करताना योग्य विचार करावा.

4 / 5

आयुष्यात संकटं आली तर घाबरून न जाता त्यांना तोंड द्यावे. धैर्य आणि बुद्धीचातुर्याने निर्णय घेणारी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. तसेच आयुष्यात योग्य व्यक्ती कोण आहे, हे ओळखणे गरजेचे आहे. आयुष्यात संकटकाळात मदतीला धावणारेच मित्र बनवा, असे चाणक्य नीती सांगते.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us