AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथमध्ये रणकंदन, भाजपा – मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, कारची तोडफोड ;नेमकं काय घडलं ?

अंबरनाथमध्ये भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये कार्यालयाच्या ताब्यावरून मोठा राडा झाला. हनुमान मंदिर परिसरात सुरू झालेला हा वाद शिवाजी नगर पोलिस ठाण्यातही पोहोचला, जिथे मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना मारहाण करत त्यांची गाडी फोडण्यात आली. तणावपूर्ण परिस्थितीनंतर गुन्हा दाखल झाला, मात्र भाजप कार्यकर्त्यांवर अजून कारवाई नाही, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंबरनाथमध्ये रणकंदन, भाजपा - मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, कारची तोडफोड ;नेमकं काय घडलं ?
भाजप -मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा
| Updated on: Aug 12, 2026 | 8:21 AM
Share

अंबरनाथमधून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबरनाथ शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. भाजप कार्यालयाच्या मुद्यावरून भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.शिवाजी नगर पोलिस स्थानकाच्या आवारातच भाजप कार्यकर्त्यांनी मनसेचे शहराध्यक्ष शिर्के यांना मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्यांनी शैलेश शिर्के यांची चारचाकी गाडीही फोडली. यामुळे अंबरनाथमध्ये प्रचंड राडा झाला आणि तणावापूर्ण परिस्थिती होती. या मारहाणीची चर्चा संपूर्ण शहरात होत असून परिसरातील नागरिक मात्र धास्तावले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकाच्या आवारातच शिर्केंना मारहाण केल्याचं उघड झालं असून वातावरण प्रचंड तापलं होतं. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं ?

अंबरनाथ पूर्वेकडील हनुमान मंदिर परिसरात भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे. मात्र याच कार्यालयाच्या ताब्यावरून भाजप आणि मनसेमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हा वाद झाला. भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल होते. मनसेचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक नागरिक हेही तेथे उपस्थित होते. कार्यालयाच्या ताब्यावरून हा वाद निर्माण झाला होता. त्याच मुद्यावरून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बघता बघता हा वाद पेटला, प्रकरण प्रचंड तापलं आणि वादावादीच रुपांतर हळूहळू हाणामारीत झालं. भाजप आणि मनसे कार्यकर्ते तिथे एकमेकांशी भिडले, एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. लाथा-बुक्क्यांनी मारामारी झाली.

शिर्केविरोधात गुन्हा दाखल

अखेर लोकांनी मध्यस्थी करत हा वाद काही काळ सोडवला. त्यानंतर भाजप आणि मनसे कार्यकर्ते, दोन्ही पक्ष हे शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गेले. मात्र तिथे जाऊन वाद पुन्हा पेटला, परत शाब्दिक चकमक उडाली आणि हाणामारीला पुन्हा सुरूवात झाली, एकमेकांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर तेथील शिर्के यांच्या चारचाकी गाडीची तोडफोडही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र अजूनही भाजप कार्यकर्त्यांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. एका कार्यालयावरून झालेल्या वादाने पेट घेतल्याने मोठा राडा झाल्याचे अंबरनाथमध्ये दिसून आलं. शिवाजी नगर पोलिस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

Follow Us
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत