AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : वयाच्या 62 व्या गोविंदा उरकणार दुसरं लग्न? 46 वर्षीय अभिनेत्रीसोबत खास व्हिडीओ व्हायरल

Govinda : वयाच्या 62 व्या वर्षी गोविंदा 46 वर्षीय अभिनेत्रीसोबत उरकणार दुसरं लग्न? तिच्यासाठी खर्च केलेत कोट्यवधी रुपये... दोघांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Govinda : वयाच्या 62 व्या गोविंदा उरकणार दुसरं लग्न? 46 वर्षीय अभिनेत्रीसोबत खास व्हिडीओ व्हायरल
अभिनेता गोविंदा
| Updated on: Aug 12, 2026 | 8:22 AM
Share

Govinda : गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता लवकरच ‘रुपा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात गोविंदा याच्यासोबत अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.  आता देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गोविंदा आणि कोमल यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

रोहित नावाच्या एक्स अकाउंटवरुन गोविंदा आणि कोमल यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लिहिलं आहे की, ‘भविष्यात जर कधी गोविंदा याने कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत लग्न केलं तर आश्चर्य वाटू देऊ नका.  ‘रुपा’ सिनेमाची निर्मिती करण्यासाठी अभिनेत्याने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.’

एवढंच नाही तर,  पुढे असं देखील लिहिण्यात आलं आहे  की, ‘त्याने सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून 46 वर्षांच्या कोमल राणी स्वर्णकार हिची निवड केली आहे. दोघांच्या वागणुकीकडे एकदा लक्ष द्या’, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर, वयाच्या 62 व्या वर्षी गोविंदा 46 वर्षीय अभिनेत्रीसोबत दुसरं लग्न उरकणार  का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांवर मोठा खुलासा केलेला. गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा आणि  सुनीता एकत्र देखील राहत नाहीत. सुनीता मुलांसोबत राहते, तर गोविंदा एकटाच राहतो. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत सुनीता असं देखील म्हणालेली की, ‘कोमल या नावाचा मला तिरस्कार आहे…’ आणि आता गोविंदा, कोमल नावाच्या अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करत आहे.

पत्नी सुनीता आहुजा हिच्या आरोपांवर काय म्हणाला अभिनेता?  

गोविंदा म्हणालेला, यश मिळवण्यासाठी आपल्या लोकांना वाईट करणं गरजेचं आहे? सुनिता असं करत आहे दुसऱ्याला वाईट ठरवणं थोडं सोपं असतं. ती माझ्याबद्दल चार गोष्टी चांगल्या सांगते आणि एक गोष्ट वाईट सांगते… तर  त्यामध्ये प्रेम मला तिचं दिसून येत…’, सांगायचं झालं तर, गोविंदा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गोविंदा याचे ‘रुपा’ आणि ‘दुनियादारी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत