मुलांना पीनट बटर खूप आवडत असेल तर घरातच बनवा, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

मुलांना रोज काय नवीन द्यावं असा विचार कायम एक आई करत असते... अशात पीनट बटर आनेक जण विकत घेतात. पण तुम्ही घरातच पीनट बटर तयार करु शकता.. जे मुलांच्या आरोग्यास देखील लाभदायक ठरेल... तर पीनट बटर बनवण्याचा सोपीपद्धत घ्या जाणून...

| Updated on: Dec 14, 2025 | 6:22 PM
1 / 5
सर्वात आधी पीनट बटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या. शेंगदाणे (कच्चे किंवा भाजलेले) – 2 कप, मीठ – चवीपुरते, मध / साखर – 1–2 टीस्पून, तेल (शेंगदाण्याचं किंवा कोणतंही न्यूट्रल तेल) – 1–2 टीस्पून (गरज असल्यास)

2 / 5
सर्वात आधी कच्चे शेंगदाणे असतील तर मध्यम आचेवर कढईत हलके खरपूस भाजा. थंड होऊ द्या आणि सोलून घ्या. भाजलेले शेंगदाणे मिक्सर/ब्लेंडरमध्ये घाला. सुरुवातीला ते पूडसारखे होतील, थोड्या वेळाने तेल सुटून पेस्ट तयार होईल.

3 / 5
मीठ, मध किंवा साखर हे पदार्थ चवीनुसार घाला... खूप घट्ट वाटत असेल तर 1–2 टीस्पून तेल घाला. गुळगुळीत आणि क्रीमी होईपर्यंत ते वाटून घ्या...  त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. तयार झालेले  पीनट बटर रूम टेम्परेचरला 1–2 आठवडे, फ्रिजमध्ये 1 महिना टिकते.

4 / 5
क्रंची पीनट बटर हवं असेल तर थोडे शेंगदाणे जाडसर कुटून शेवटी मिसळा. कोणतंही प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे हे जास्त हेल्दी असतं. पीनट बटर खाल्याने पोट लवकर भरल्यासारखं वाटतं. पण जास्त प्रमाणात खाल्लं तर वजन वाढू शकतं.

5 / 5
तुम्ही पीटन बटर ब्रेड/टोस्टवर लावून, सँडविचमध्ये, दूध किंवा केळीच्या स्मूदीत, फिटनेस डायेटमध्ये देखील सामिल करू  शकता. जिम / व्यायाम करणाऱ्यांसाठी पीटन बटर लाभदायक आहे.