
किचन ही घरातील अशी जागा आहे, जी नेहमी स्वच्छ असणे गरजेचे आहे. कारण किचनमधून दुर्गंधी येत असेल तर स्वयंपाक करायलाही मन लागत नाही. त्यामुळेच किचनमध्ये निघालेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

अनेकजण किचनमध्ये निघालेला कचरा थेट किचनमधील डस्टबीनमध्ये टाकतात. त्याचा परिणाम म्हणून किचनमध्ये फार दुर्गंधी सुटते. किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबीनला दुर्गंधी येऊ नये म्हणून काही खास बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

काही घरगुती उपाय अवलंबून किचनमधील डस्टबिनची दुर्गंधी घालवता येऊ शकते. बेकिंग सोड्याच्या माध्यमातून तुम्ही किचनमधील डस्टबिन साफ करू शकता. कारण बेकिंग सोडा हा नॅचरल क्लिनर म्हणून काम करतो.

बेकिंग सोड्याने साफ केल्यानंतर गरम पाण्याने डस्टबिनला धुतले तर त्यातून येणारी दुर्गंधी नाहीशी होते. लिंबाच्या साली पाण्यात उकळाव्यात. त्यानंतर ते गरम पाणी डस्टबीनमध्ये टाकून डस्टबीन साफ करावी. हा उपाय अवलंबला तर डस्टबीनमधून येणारी दुर्गंधी कमी होते.

कचरा टाकण्याआधी डस्टबीनमध्ये एक कप बेकिंग सोडा टाकून द्या. डस्टबीन कचऱ्याने भरली तर वरूनदेखील थोडा बेकिंग सोडा टाकावा. तसे केल्यास कचऱ्याला दुर्गंधी येत नाही.