
केळी आरोग्यासाठी खूप चांगली असते. पण केळी विकत आणायची म्हणजे, केळी लवकर खराब होते. पण केळी ताजी ठेवायची असेल तर तुम्ही काही उपाय करू शकता.

केळी इतर फळांपेक्षा लवकर पिकते आणि काळी पडू लागते. फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही, कारण त्याचा पोत आधीच थंड आहे. केळी रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता अनेक दिवस कशी साठवायची ते जाणून घेऊया.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की केळी साठी हँगर्स पण असतात. केळी खराब होण्यापासून वाचवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे हँगर्स आहेत. आपल्याला फक्त त्यात केळींना हँगर्सला टांगायचं आहे. अशी केळी टिकून राहते, फ्रेश राहते. बरेच दिवस केळी नीट राहिल्याने तुम्हीही ती आरामात खाऊ शकता.

केळी अनेक दिवस ताजी ठेवायची असेल तर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या बाजारातून आणून एक ग्लास पाण्यात टाकून चांगले मिक्स करा. आता या पाण्यात केळी भिजवा. व्हिटॅमिन सी मुळे केळी फ्रेश राहतात.

वॅक्स पेपरमध्ये लपेटून घ्या: केळी जास्त वेळासाठी ठेवण्यासाठी तुम्ही वॅक्स पेपरने ती केळी गुंडाळून ठेऊ शकता. केळी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तुम्ही वॅक्स पेपरचा भरपूर वापर करता. याच्या मदतीने तुम्ही केळी गुंडाळू किंवा झाकून ठेवू शकता. अशा वेळी केळी लवकर खराब होणार नाही.