
आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 फेरीला सुरूवात होणार आहे. सुपर 8 मध्ये पाकिस्तान संघाला आपली जागा मिळवता आली नाही. अमेरिका संघाने त्यांचा पराभव करत आपली जागा मिळवली.

या स्पर्धेमध्ये आणखी न्यूझीलंड आणि श्रीलंका यांनाही सुपर-8 फेरीपर्यंतच मजल मारता आली. आता सुपर-8 फेरी सुरू होण्याआधी आयसीसीने टी-20 रंँकिंग जाहीर केली आहे.

या यादीमधील अष्टपैलूंच्या यादीमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. कारण हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा अफगाणिस्तान संघाच्या अष्टपैलू खेळाडूने आपलं एक नंबरचं स्थान गमावलं आहे.

अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी याला नुकसान झालं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याला आपली छाप पाडता आलेली नाही. याचाच फटका त्याला बसला आहे.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने 231 रेटिंग गुणांसह पहिला स्थान मिळवलं आहे. नबी आता 213 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.