
पाकिस्तानचा संघ सद्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची श्रृंखला खेळवली जात आहे. परंतु या श्रृंखलेतील दुसरा सामना खूपच चर्चेत आला आहे. ढाका येथील शेर ए बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला.

या सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटपटू सलमान अली आघा फारच विचित्र पद्धतीने बाद झाला आहे. धावचित झाल्यानंतर तो बांगलादेशी खेळाडूंवर खूपच भडकल्याचे दिसला. त्यामुळे आता आयसीसीनेही आघा याच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. धावचित झाल्यानंतर सलमान अली आघाने बांगलादेशी खेळाडूंसोबत वाद घातला.

तसेच हेल्मेट आणि बॅट मैदानावरच फेकून दिली. त्याचे हे कृत्य आचार संहितेच्या अनुच्छेद 2.2 चे उल्लंघन असल्याचा ठपका आयसीसीने ठेवला आहे. क्रिकेट खेळावयाच्या उपकरणांच्या दुरपयोगासंबंधीचे हे कलम आहे. आयसीसीने सलमान आली आघाच्या खात्यावर एक डिमिरिट पॉइंट जोडला आहे.

आयसीसीचा हा निर्णय म्हणजे सलमान अली आघाला एका प्रकारची शिक्षाच असल्याचे बोलले जात आहे. बांगलादेशच्या विरोधात सलमान चांगल्या पद्धतीने फंलदाजी करत होता. त्याच्यासोबत मोहम्मद रिझवाह हा खेळाडूही फलंदाजी करत होता. मोहम्मदने चेंडू मारल्यानंतर तो गोलंदाजी करत असलेल्या मेहंदी हसन मिराजकडे गेला.

हा चेंडू पकडताना मिराज आणि सलमान यांच्यात धडक झाली. याच वेळी सलमानने चेंडू हातात घेऊन तो मिराजकडे देण्याचा प्रयत्न केला. परंतु मिराजनेच अगोदर तो चेंडू घेऊन सलमानला बाद केले. याच कारणामुळे सलमान खूप चिडला. आता त्याच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे.