
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचा अंतिम सामन्याला काही क्षणात सुरुवात होणार आहे. परंतु पावसामुळे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. हा सामना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुरू होणार होता.

मात्र पावसामुळे या सामन्यासाठी नाणेफेकही होऊ शकलेली नाही. दरम्यान, पासवाची अशीच स्थिती राहिल्यास जेतेपदाची ट्रॉफी नेमकी कोणाला मिळणार? असा सवाल केला जात आहे.

खरं म्हणजे आयसीसीच्या नियमानुसार 2 ऑक्टोबर रोजीचा अंतिम सामना काही कारणास्तव न होऊ शकल्यास त्यासाठी आणखी एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.

आज सामना न झाल्यास सोमवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी हा अंतिम सामना खेळवला जाईल. आजच म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजीच सामना संपवण्याचा पंच प्रयत्न करतील.

रिझर्व्ह डे च्या दिवशीदेखील हा सामना न होऊ शकल्यास मात्र आयसीसीला मोठा निर्णय घ्यावा लागू शकते. याच निर्णयाअंतर्गत भारताला एकही चेंडू न खेळता जेतेपदाची ट्रॉफी मिळू शकते.

आज तसेच रिझर्व्ह डेच्या दिवशीही हा अंतिम सामना न होऊ शकल्यास आयसीसी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही सघांना विजेता म्हणून घोषित करेल. या दोन्ही संघांमध्ये जेतेपदाची ट्रॉफी दिली जाईल.

परंतु असे होण्याची शक्यता फारच कमी आहे. सामना 2 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आजच खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.