वाळवंटात हिमवर्षाव! सहारा आणि सौदी अरबवर बर्फाची चादर

| Updated on: Jan 18, 2021 | 8:01 PM

दरवर्षी जानेवारी महिन्यात जगातील बर्‍याच भागांमध्ये हिमवर्षाव होतो. परंतु आफ्रिकेतील सहारा वाळवंट आणि मध्य-पूर्व प्रदेशातील काही देशांमध्ये सहसा हिमवृष्टी होत नाही. परंतु यंदा सहारा वाळवंटात हिमवर्षाव झाला आहे.

1 / 4
दरवर्षी जानेवारी महिन्यात जगातील बर्‍याच भागांमध्ये हिमवर्षाव होतो. परंतु आफ्रिकेतील सहारा वाळवंट आणि मध्य-पूर्व प्रदेशातील काही देशांमध्ये (सौदी अरब व मोठ्या प्रमाणात वाळवंट असलेले आसपासचे देश) सहसा हिमवृष्टी होत नाही. परंतु या महिन्यात सहारा वाळवंटात हिमवर्षाव झाला आहे. तसेच सौदी अरबमधील तापमान -2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरलं आहे.

2 / 4
सहारा वाळवंट आणि सौदी अरबमध्ये झालेल्या हिमवृष्टीने जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असे मानले जाते की, सहसा वाळवंटी प्रदेशात बर्फवृष्टी होऊ शकत नाही, परंतु निसर्गाने त्याचं रूप बदलत ते शक्य करुन दाखवलं आहे. सहारा वाळवंटात वाळूचे ढिग बर्फाने झाकले गेले आहेत. काही ठिकाणी हे वाळूचे ढिग नसून बर्फाचेच ढिग आहेत, असे चित्र दिसत आहे. सोबतच त्या प्रदेशातील तापमान शून्य अंशाहून खाली गेलं आहे, त्यामुळे हा प्रदेश अतिशीत होत आहे.  (Photo Credit-Karim Bouchetata)

3 / 4
दरम्यान, सौदी अरमधील असिर प्रदेशात असलेल्या वाळवंटाच्या भागात स्थानिक आणि परदेशी लोकांचे आगमन सुरू झाले आहे. परंतु, असिर प्रदेशातील स्थित पर्वत आणि वाळवंटातील प्रदेश बर्फाने व्यापलेले आहेत. जवळपास अर्ध्या शतकानंतर या प्रदेशातील तापमान 0 अंशांपेक्षा खाली गेलं आहे. सध्या येथील तापमान -2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलं आहे. (Photo Credit- Abu nayef Fawaz al-harbi)

4 / 4
छायाचित्रकार करीम बुचेता यांनी अल्जेरियातील वाळवंटातील ऐन सेफ्राचे काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रांमध्ये दिसतंय की, बर्फाच्छादित सहारा वाळवंटातील टेकड्यांवरुन मेंढरे जात आहेत. या भागातील तापमान -3 अंशांपर्यंत खाली आले आहे. ऐन सेफ्राला वाळवंटाचे गेटवे म्हणतात. हे वाळवंट समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीवर आहे. सहारा वाळवंटाने उत्तर आफ्रिकेचा बहुतांश भाग व्यापलेला आहे आणि गेल्या अर्ध्या शतकात या प्रदेशात पहिल्यांदाच इतका मोठा तापमान बदल पहायाला मिळत आहे. (Photo credit-Karim Bouchetata)