
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. नुसतं साप नाव जरी ऐकलं तरी थरकाप उडतो. जर तो आपल्या परिसरात किंवा घरात निघाला तर मग विचारूच नका.

सापांबाबात आपल्या मनात एवढी भीती का असते? त्याचं मुख्य कारण म्हणजे सापांबाबत आपल्या मनात असलेलं अज्ञान, प्रत्येक साप हा विषारीच आहे, असा अनेकांचा लाहनपणापासून गैरसमज असतो. या गैरसमजातून ही भीती निर्माण होते.

पंरतु ही गोष्टी खरी नाहीये, भारतामध्ये सापांच्या हजारो प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. मात्र त्यातील 85 टक्के प्रजाती या बिनविषारी आहेत. तर केवळ 15 टक्केच सापाच्या जाती या विषारी आहेत.

भारतामध्ये तसेच आपल्या राज्यात सापाच्या ज्या काही जाती आढळून येतात. त्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा देखील म्हणतो. या चार प्रमुख विषारी जाती आढळून येतात, त्यामुळे सापाने दंश केल्यास घाबरून न जाता, तातडीनं संबंधित व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळून द्यावी. वैद्यकीय मदत वेळेत मिळाल्यास विषारी साप चावला तरी देखील रुग्णाचा जीव वाचू शकतो.

दरम्यान तुमच्या घराच्या आसपास साप निघाल्यास त्याला मारू नये, किंवा स्वत:हून पकडण्याचा प्रयत्न देखील करू नये. असे करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. तर त्याची माहिती तुमच्या परिसरात असलेल्या सर्पमित्रांना द्या.

सापाचं मुख्य अन्न हे उंदीर, घुस यासारखे प्राणी असतात. त्यामुळे आपल्या घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा, कुठे बीळ तर नाहीना यावर देखील लक्ष ठेवा. आता आपण पाहूयात अशा कोणत्या तीन वनस्पती आहेत, ज्याच्या वासामुळे साप त्या परिसरात येत नाही.

तुम्ही राहात असलेल्या परिसरामध्ये किंवा तुमच्या घरात साप येऊ नये यासाठी तुम्ही सर्पगंधा या वनस्पतीची लागवड करू शकता. या वनस्पतीला तीव्र वास असतो. या वनस्पतीच्या विशिष्ट वासामुळे साप अजुबाजूच्या परिसरामध्ये येत नाही. सर्पगंधा वनस्पतीप्रमाणाचे तुम्ही तुमच्या घरात मगवॉर्ट किंवा लसणाचं रोप देखील लावू शकता. ही दोन रोपं असे आहेत, याच्या वासामुळे देखील साप तुमच्या घरात येणार नाही. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)