
विजेचे दर सतत वाढत आहेत, ज्यामुळे लोक अनेकदा बचत करण्याचा विचार करतात जेणेकरून त्याचा त्यांच्या खिशावर परिणाम होऊ नये. आजकाल प्रत्येकाच्या घरात रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज असतोच. पण बरेच लोक कमी वीज वापरण्याच्या नादात सकाळी फ्रीज चालू करतात आणि रात्री बंद करतात. तसेच, घराबाहेर पडतानाही ते फ्रीज बंद करतात. मात्र अशा प्रकारे नेमही फ्रीज चालू आणि बंद करणे योग्य आहे का ते जाणून घेऊया.

वीज वाचवण्याच्या प्रक्रियेत जर तुम्ही तुमचा रेफ्रिजरेटर वारंवार बंद केला तर तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. तुमचा फ्रीज खराब होऊ शकतो, ज्याची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते.

आजकाल बहुतेक रेफ्रिजरेटर हे ब्रँड ऑटो पॉवर कट फीचरसह येतात. या फीचरमुळे, रेफ्रिजरेटर थंड झाल्यावर कंप्रेसर आपोआप बंद होतो. कंप्रेसर बंद केल्याने वीज वाचते आणि खर्चही कमी होतो. रेफ्रिजरेटर वारंवार मॅन्युअली चालू आणि बंद केल्याने रेफ्रिजरेटरच्या कंप्रेसरवर परिणाम होऊ शकतो. तसेच, रेफ्रिजरेटरच्या कूलिंग सिस्टमवर जास्त दबाव येतो.

तज्ञांच्या सांगण्यानुसार, फ्रीजमध्ये काहीही असो वा नसो, तो वारंवार चालू आणि बंद करू नये. हिवाळ्याच्या काळात बरेचदा लोक फ्रीज बंद करतात. जर एखादी वस्तू बंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली तर ती खराब होण्याची शक्यता जास्त असते.

याशिवाय, फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडू किंवा बंद करू नये. असे केल्याने त्यातील कूलिंग कमी होतं आणि कंप्रेसर बराच काळ चालतो. त्यामुळे वीज बिल वाढते. बऱ्याचदा, दरवाजा व्यवस्थित बंद न केल्यासही, फ्रीजचं कूलिंग देखील बिघडू शकते आणि तो खराब होऊ शकतो.

रेफ्रिजरेटर नेहमीच चालू ठेवायचा असे नाही. तुम्ही दर दोन आठवड्यांनी एकदा रेफ्रिजरेटर डीफ्रॉस्ट किंवा स्वच्छ करू शकता. असे केल्याने त्यामध्ये बर्फ तयार होण्याची समस्या येत नाही आणि रेफ्रिजरेटर देखील स्वच्छ होतो, ज्यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेले अन्न स्वच्छ राहते. अशा परिस्थितीत, तुम्ही एसीप्रमाणे वेळोवेळी रेफ्रिजरेटर स्वच्छ करत रहा.