

दान-धर्म करणाऱ्यांच्या धन-संपत्तीत कधीच कमी येत नाही. उलट ती वाढते. त्यामुळे अनेक व्यापारी, उद्योजक धर्मादाय संस्था सुरू करतात. त्यांना दान देतात. गरीबांमध्ये चांगल्या वस्तूचं वाटप करतात. एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावतात.

गरीब आणि गरजू व्यक्तीच्या मदतीला जो तयार राहतो, त्याला धनाची, पैशांची कमी पडत नाही. अशा लोकांसाठी जेवण, कपडे, औषधी आणि शिक्षणाची तजवीज करणाऱ्यांवर लक्ष्मी प्रसन्न असते.

तर धार्मिक कार्यासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्यांची पण उन्नती होते. जी व्यक्ती धार्मिक कार्यासाठी खारीचा का असेना वाटा उचलते, त्याच्याकडे पैसा टिकतो, असे आचार्य चाणक्य सांगतात.


पण दानधर्म करताना दानकर्त्याने त्याच्या आर्थिक स्थितीचा पण विचार करणे आवश्यक आहे. आपल्या कुवतीनुसार दानधर्म करावा असा सल्ला आचार्य चाणक्य देतात.