IND vs NZ : इतका चांगला खेळतो पण कॅप्टन शुबमन गिलने वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा असा दिवस पाहिला
IND vs NZ : कॅप्टन शुबमन गिलची बॅट वेलिंग्टन वनडे मध्ये तळपली नाही. दुसऱ्या डावाला सुरुवात होताच शुबमन गिलची इनिंग संपली. रोहित शर्मा सोबत ओपनिंग पार्टनरशिप बनण्याआधीच गिलचा डाव कोलमडला.

शुबमन गिलला करिअरमध्ये पहिल्यांदा असा दिवस पहावा लागला. वनडेमध्ये शुबमन गिलने याआधी कधी अशा स्थितीचा सामना केला नव्हता. शुबमन गिल सोबत पहिल्यांदा असं काय घडलं?. वनडे करिअरमध्ये शुबमन गिल कितीवेळा शून्यावर आऊट झालाय.
शुबमन गिलने 2019 साली कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे डेब्यू केला होता. तेव्हापासून आतापर्यंत गिल एकूण 72 सामने खेळला आहे. यात 71 इनिंगमध्ये आतापर्यंत दोनवेळा तो डक झालाय. यात एक डक आज वेलिंग्टन सामन्यात झाला. न्यूझीलंड विरुद्ध वेलिंग्टन वनडे मध्ये शुबमन गिल डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जेकब डफीने त्याची विकेट काढली.
क्रिकेटच्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवर बाद होण्याला गोल्डन डक म्हटलं जातं. भारतीय कर्णधार शुबमन गिल वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा गोल्डन डक झाला. वेलिंग्टन वनडे मध्ये त्याच्यासोबत हे घडलं.
शुबमन गिलच्या रुपाने वेलिंग्टन वनडे मध्ये भारताचा पहिला विकेट गेला. रोहित शर्मासोबत फक्त चार रन्सची त्याने ओपनिंग पार्टनरशिप केली. गिलने ऑकलंडच्या पहिल्या वनडेमध्ये 37 धावा केल्या होत्या.
गिलने त्याच्या वनडे करिअरमध्ये 72 सामन्यात 63.55 च्या सरासरीने आतापर्यंत 3750 धावा केल्या आहेत. यात 11 सेंच्युरी आणि 20 हाफ सेंच्युरी आहेत. वनडे करिअरमध्ये शुबमन गिलची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 223 धावा आहेत.