
टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा T-20 सुरू सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 234-2 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुरळा उडवला.

अभिषेक शर्माचे वादळी शतक आणि रुतुराज गायकवाड याचे अर्धशतकाने गोलंदाजांची पिसे काढलीत. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. धोनीच्या तालमीत तयार झालेल्या रुतुराजने धोनीला अर्धशतक करत बर्थ डे गिफ्ट दिलं.

आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा याने 47 धावांमध्ये 100 धावांची वादळी खेळी (7 चौकार, 8 षटकार) केली. रुतूराज गायकवाड नाबाद 77 धावा, रिंकू सिंह नाबाद 48 धावा केल्या. या तिघांच्या वादळी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेविरूद्ध भारताने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

टीम इंडियाने झिम्बाब्वेविरूद्ध हरारेच्या मैदानावर टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोर केला. टीम इंडियाने 234-2 धावा केल्या आहेत. आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने 229 धावा केल्या होत्या, हा विक्रम टीम इंडियाच्या शिलेदारांनी मोडला आहे.

पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका झाली पण आज टीम इंडियाने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच घाम काढला.