प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल…! विरोधी पक्षाची ताकद असलेल्या राहुल गांधींवर नेमके किती गुन्हे दाखल?

विनापरवाना आकाशवाणी भवन परिसरात प्रवेश केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर काल दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आज राहुल गांधी यांनी सांगितलं की माझ्यावर ४५ गुन्हे दाखल असून त्याने काही फरक पडत नाही.

| Updated on: Oct 07, 2026 | 7:24 PM
1 / 6
इंडिया आघाडीने काल आणि आज दिल्लीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. निवणडूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर पोहचण्याची घोषणा केली खरी पण त्यांना पोलिसांनी पुन्हा एकदा अडवले आहे. पोलिसांना राहुल आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे.

इंडिया आघाडीने काल आणि आज दिल्लीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. निवणडूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर पोहचण्याची घोषणा केली खरी पण त्यांना पोलिसांनी पुन्हा एकदा अडवले आहे. पोलिसांना राहुल आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे.

2 / 6

आज दुपारी दिल्लीतील सागर रत्ना रेस्टोरेंटमध्ये लंच पार पडल्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी बैठक घेतली. या बैठकीला लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते. तेव्हा हा मोठा निर्णय झाला पण आता पोलिसांनी अनेक खासदार आणि नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.

3 / 6

राहुल गांधींनी कालही दिल्लीमध्ये आकाशवाणी भवन परिसरामध्ये ८-९ तासांचा ठिय्या दिला होता. यावेळी त्यांच्यासोबत सर्व विरोधी खासदार आणि त्यांच्या बहिण खासदार प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.

4 / 6

त्यांना कालही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज परत एकदा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी यावेळी बसची हवा काढली आणि आंदोलकांना पुढे जंतरमंतर कडे जाण्यापासून रोखलं.

5 / 6

दरम्यान, आज जंतरमंतरवर आंदोलनासाठी निघताना राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, माझ्यावर ४५ गुन्हे दाखल आहेत. माझ्यावर १०० गुन्हे दाखल झाले तरी चालेल, ते माझ्यासाठी मेडल आहेत, असं राहुल यांनी सांगितलं. त्यामुळे राहुल गांधींवर खरंच नेमके किती गुन्हे दाखल आहेत, याबद्दल सांगायचं झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर देशात विविध भागात मिळून १८ गुन्हे दाखल होते.

6 / 6

परंतू त्यानंतर २०२६ पर्यंत राहुल यांच्यावर देशभरात विविध मानहानी आणि राजकीय आंदोलन केल्यामुळे एकूण ३२ ते ४५ खटले दाखल झाल्याचा उल्लेख वेळोवेळी समोर आला आहे. आज स्वतः राहुल यांनीही त्यांच्यावर ४५ गुन्हे दाखल असल्याचं म्हटलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : काँग्रेस, ट्विटर हँन्डल)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us