अमेरिकेतून भारताला लवकरच मोठी गुड न्यूज, टॅरीफ आता… ट्रेड डिलमुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ!

भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार करारावर चर्चा चालू आहे. असे असतानाच आता शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. लवकरच भारताला खुशखबर मिळणार का? असे विचारले जात आहे.

| Updated on: Nov 19, 2025 | 6:36 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावलेला आहे. या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ आकारला जातो. त्याचाच परिणाम म्हणून भारताच्या व्यापाराला मोठा फटका बसला आहे.

2 / 5
दरम्यान, अमेरिकेने हा टॅरिफ कमी करावा तसेच व्यापारकोंडी फुटावी यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार केला जात आहे. त्यामुळेच अमेरिका लवकरच भारतावरील टॅरिफ कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच शक्यतेचा परिणाम म्हणून भारतातील काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळेच भारतातील काही कंपन्यांच्या समभागांत तेजी आली आहे. अवंती फीड्स, अॅपेक्स फ्रोझन फुड्स आणि कोस्टल कॉर्पोरेशन यासारख्या काही कंपन्यांमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार अवंती फीड्स या कंपनीच्या समभागात 10 टक्क्यांनी तेजी आली असूनही हा समभाग 849.85 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीचा शेअर जून 2025 पासून आपल्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे

5 / 5
अॅपेक्स फ्रोझन फुड्स, कोस्टल कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या शेअरमध्येही 10 टक्क्यांनी तेजी आली आहे. त्यामुळे आता भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची कधी घोषणा होणार आणि त्यानंतर अमेरिका भारतावरील टॅरिफ कधी कमी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.