
जागतिक व्यापारात भारताचे योगदान वाढावे यासाठी भारत जगभरातील वेगवेगळ्या देशांसोबत आपल्या व्यापाराचा विस्तार करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावलेला असला तरी इतर देश भारतासोबत करा करायला उत्सुक आहेत.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार भारत आणि चार युरोपीय देशांमध्ये एक ऐतिहासिक व्यापार करार झाला आहे. या व्यापार कराराला भारत-इंएफटीए ट्रेड अँड इकोनॉमिक पार्टनरशीप अॅग्रीमेंट (टीईपीए) म्हटले जात आहे.

हा व्यापार करार 1 ऑक्टोबर 2025 रोजीपासून लागू झाला आहे. स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड, लिकटेस्टी यासारख्या विकसित देशांसोबत होणारा भारताचा हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे.

या व्यापार करारामुळे एकूण 10 लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच या करारामुळे आगामी 15 वर्षांमध्ये साधारण 100 अब्ज म्हणजेच 8,87,200 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

या कराराची भारताच्या प्रगतीत मोठी आणि महत्त्वाची भूमिका असणार आहे. या कराराचे भारताकडून स्वागत केले जात आहे.