देशात सर्वात महाग जमीन कोणत्या शहरात? दर ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल!

सध्या जमिनीच्या वाढत्या दरामुळे आणि महागाईमुळे सर्वसामान्यांना घर घेणं शक्य होत नाही. त्यातच आता देशातील सर्वात महाग जमीन कोणत्या शहरात आहे, याची एक माहिती समोर आली आहे.

| Updated on: Aug 15, 2025 | 3:04 PM
1 / 8
आपल्यापैकी अनेकांचे देशातील विविध मेट्रो सिटीमध्ये घरं असावं असे स्वप्न असते. या स्वप्नासाठी सर्वजण धडपड करत असतात. पण सध्या जमिनीच्या वाढत्या दरामुळे आणि महागाईमुळे सर्वसामान्यांना घर घेणं शक्य होत नाही. त्यातच आता देशातील सर्वात महाग जमीन कोणत्या शहरात आहे, याची एक माहिती समोर आली आहे.

2 / 8
आता नुकतंच नवीन सर्कल रेट जाहीर झाले आहेत. यानुसार भारतातील सर्वात महाग जमीन मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे.  मुंबईत जमिनीचा सरासरी दर १ लाख ते ८ लाख प्रति चौरस फूट इतका आहे.

3 / 8
याचा अर्थ, सामान्य माणसासाठी मुंबईत एक साधा फ्लॅट घेणेही आता खूपच अवघड झाले आहे. हे दर फक्त सरकारी रेकॉर्डनुसार असून मार्केटमधील प्रत्यक्ष दर यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहेत.

4 / 8
मुंबईनंतर देशातील इतर काही मोठ्या शहरांमध्येही जमिनीचे दर खूप जास्त आहेत. देशाची राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी जमिनीचा सरासरी दर ₹७० हजार ते ₹६ लाख प्रति चौरस फूट आहे.

5 / 8
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चंदीगढ राज्य असून या ठिकाणी जमिनीचे दर ₹ ६६ हजार ते ₹ १.७५ लाख प्रति चौरस फूट आहेत. यानंतर उत्तर प्रदेशातील नोएडा शहर चौथ्या क्रमांकावर आहे. नोएडातील जमिनीचे दर ₹६३ हजार ते ₹१.७० लाख प्रति चौरस फूट आहेत.

6 / 8
महाराष्ट्रातील पुणे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. येथील जमिनीचा सरासरी दर ₹३८ हजार ते ₹१.४० लाख प्रति चौरस फूट आहे. तसेच सहाव्या क्रमांकावर बंगळूरुचा समावेश असून जमिनीचा दर ₹४५ हजार ते ₹१.२५ लाख प्रति चौरस फूट आहे.

7 / 8
यानतंर चेन्नई हे सातव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा दर ₹६० हजार ते ₹९५ हजार प्रति चौरस फूट आहे. यानंतर आठव्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादमध्ये जमिनीचा दर ₹६४ हजार ते ₹८५ हजार प्रति चौरस फूट आहे.

8 / 8
या यादीतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशमधील तीन शहरे टॉप १० मध्ये आली आहेत. गाझियाबादने लखनऊला मागे टाकून नववे स्थान मिळवले आहे, तर लखनऊ दहाव्या क्रमांकावर आहे.