
आशिय चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचा सामना सुरू झाला आहे. दुबईतील मैदानात हा सामना होत असून देशातील कोट्यवधी क्रिकेटरसिक आज सामना पाहात आहेत. दरम्यान, एकीकडे हा सामना चालू असतानाच दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने एक मागणी केली आहे.

रविना टंडन हिने तिच्या सोशल मीडियावर ही मागणी केली आहे. ही मागणी तिने इन्स्टाग्राम तसेच ट्विटरवर पोस्टही केली आहे. हा सामना चालू असताना भारतीय संघाने काळी फित बांधून पहलगामध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा तसेच सामना सुरु होण्याआधी या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यकांप्रती आंदरांजली अर्पण करावी, अशी मागणी रविना टंडन हिने केली आहे.

तिने ही मागणी करून भारतीय क्रिकेट संघाला टॅग केलं आहे. तसेच #BCCI असा हॅशटॅग वापरला आहे. भारतीय क्रिकेटचा संघ दंडावर काळी फित लावेल अशी अपेक्षा करते, असे तिने आपल्या इन्स्टा स्टोरी तसेच ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच आपला संघ पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन बाळगेल, अशीही आशा करते, असे रविना टंडनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आता सामना चालू झाल्यानंतर टीम इंडियाच्या दंडावर कोणतीही काळी फित दिसली नाही. सध्या सामना चालू झाला असून पाकिस्तानने अगोदर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.