Nimisha Priya : निमिषा प्रियाची फाशी टळली, पण आता पुढे काय? संकट पूर्णपणे टळलं का?

Nimisha Priya : येमेनमध्ये नोकरीसाठी गेलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला तिथे फाशीची सुनावण्यात आली आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी असलेली निमिषा प्रिया 38 वर्षांची आहे. निमिषा 2011 साली येमेनमध्ये गेली होती. तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.

| Updated on: Jul 16, 2025 | 8:20 AM
1 / 5
भारतीय नर्स निमिषा प्रिया येमेनमध्ये मोठ्या संकटात  सापडलीआहे. तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला वाचवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरु आहेत.  केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी असलेली निमिषा 38 वर्षांची आहे. निमिषा 2011 साली येमेनमध्ये गेली होती.

2 / 5
ती कामासाठी आपल्या कुटुंबासोबत तिथे गेली होती. या दरम्यान येमेनमध्ये अशांतता निर्माण झाली. त्यामुळे तिचा पती आणि मुलगी दोघे भारतात परतले. 2014 साली ते भारतात निघून आले. निमिषाने कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.

3 / 5
येमेनमध्ये एक नियम आहे. जर परदेशी मेडिकल प्रॅक्टिशनरला क्लीनिक ओपन करायचं असेल, तर त्याला येमेनी नागरिकाला पार्टनर बनवावं लागतं. त्यामुळेच तिने तलाल अब्दो महदीला आपलं पार्टनर बनवलं. पण त्याने कागदपत्रात हेराफेरी करुन निमिषासोबत लग्न केल्याचा खोटा दावा केला.

4 / 5
तिचा पासपोर्ट महदीच्या ताब्यात होता. अनेक वर्ष त्याने निमिषाच शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. वारंवार धमक्या दिल्या. 2017 साली निमिषाने महदीच्या तावडीतून निसटण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पासपोर्ट तिला परत मिळवायचा होता. पण त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला. त्यात महदीचा मृत्यू झाला.

5 / 5
निमिषा प्रियाची फाशी आज टळली आहे. पण फाशीला स्थगिती दिलेली नाही. म्हणजे धोका अजूनही कायम आहे. भारताचे अधिकारी आणि ग्रांड मुफ्ती तलाल अब्दोच्या कुटुंबाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. निमिषाच्या कुटुंबाने तलाल कुटुंबाला 8.5 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. ब्लड मनी स्वीकारायची की नाही, याचा निर्णय तलाल कुटुंबाला करायचा आहे.